आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मोटारसायकल चोरांची टोळी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 30, 2021
Spread the love

पंढरपूर शहर पोलिसांची कामगिरी : अठरा लाखांची एकूण ३१ वाहने जप्त

महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क

पंढरपूर : पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरांची टोळी जेरबंद करून त्यांच्याकडून १८ लाख रुपये किमतीच्या एकूण ३१ मोटारसायकली केल्या जप्त केल्या आहेत.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात १९ जून रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासकामी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम आणि पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील रेकॉर्डवरील खजुरी (ता. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक)मधील आरोपीने सदरचा गुन्हा केला आहे.

सदर इसमावर पाळत ठेवत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेंद्र मगदुम, सहायक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथकास सदर इसम हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती मिळाल्याने त्यास त्याचे घरी जावून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असून आणि इतर मोटारसायकलीही त्याच्या पिंपरी, जि. पुणे येथील साथीदारांसोबत चोरल्या असल्याचे सांगितल्याने त्यास सदर गुन्ह्यांचे तपासकामी अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्ह्यातील एक मोटारसायकल व इतर १४ मोटारसायकली अशा १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. नंतर सदर आरोपीचा त्याच्या राहत्या घरी पाळत ठेवून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचे सांगितल्यावरून त्यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे. अटकेदरम्यान त्याने १६ मोटारसायकली काढून दिल्याने सदर मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

वरीलप्रमाणे गुन्ह्यात जप्त केलेल्या मोटारसायकली या पंढरपूर शहरातील आणि अकलूज, मंडुप, मोहोळ, सोलापूर शहर, लडक, खेड, इंदापूर, मावळ, शिकर, हवेली, यवत, तळेगाव दाभाडे, जेजुरी, अंबेगाव, लाहोय, उमरगा, फलटण इत्यादी गावांतील आहेत.

सदरची कामगिरी ही, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद कदम, बिपीनचंद्र बेरे, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, इरफान मुलाणी, पोलीस नाईक इरफान शेख, शोएब पठाण, महेश पवार, सुनील बनसोडे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, विनोद पाटील, अर्जुन केवळे, अन्वर आतार (सायबर पोलीस ठाणे) यांनी केली असून, सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हवालदार इरफान मुलाणी, पोलीस नाईक इन शेरफान व शोएब पठाण हे करीत आहेत.

get_footer();