आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तू एका मुलीशी का बोलतो म्हणत मारहाण करणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 25, 2021
Spread the love

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : फुरसुंगी पॉवर हाऊस येथे घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तू एका मुलीशी का बोलते असे म्हणत बांबू, दगडाने जबर मारहाण करणारे तिघांना अटक केली असून, तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना फुरसुंगी (पॉवर हाऊस) येते २२ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.


गणेश कदम (वय २२), रोहित जाधव (वय १९), आकाश ऊर्फ कुणाल हरपळे (वय २३, तिघे रा. पॉवर हाऊस, फुरसुंगी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अजय रुक्के (वय १८, रा. ढमाळवाडी, फुरसुंगी, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी मित्रांसमवेत मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी आरोपीने तू एका मुलीसोबत का बोलते असा जाब विचारत मित्रांच्या मदतीने बांबू व दगडाने जबर मारहाण केली. यावेळी आरोपींनी हातातील कोयता, बांबू हवेत फिरवून नाचवत दहशत निर्माण केली. त्यामुळे ये-जा करणारे नागरिक पळून गेले आणि आजूबाजूला राहणारे नागरिकही भयभीत झाले. तसेच, त्यांनी दारे-खिडक्या बंद करून घेतली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात करीत आहेत.

get_footer();