आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वडिलोपार्जित मालमत्तेसाठी बहिणीला पेटविणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021
Spread the love

चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल – पुण्यातील औंधमध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून टोकाची भूमिका घेत सख्ख्या भावाने बहिणीलाच पेटविले. ही घटना औंधमध्ये शनिवारी घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी भावाला अटक केली आहे

शाम मनोहर पतंगे (वय ४५, रा. यशोधन सोसायटी, चिंतामणीनगर, बिबवेवाडी) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी औंधमध्ये राहणार्या ४५ वर्षाच्या बहिणीने फिर्याद दिली असून, त्यानुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे नात्याने सख्ये भाऊ बहिण आहेत. वडिलांच्या संपत्तीवरुन दोघांमध्ये वाद आहेत. फिर्यादी या औंधमधील घरी असताना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास शाम पतंगे त्यांच्या घरी दारु पिऊन आला. त्यांच्याशी वाद घातला. फिर्यादी या स्वयंपाक घरामध्ये खुर्चीवर बसून आराम करीत असताना शाम याने त्याच्याकडील माचिसच्या काडीने फिर्यादी यांना आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये फिर्यादी यांची हनुवटी, दोन्ही गाल तसेच मानेपासून खाली पायापर्यंतचा सर्व भाग भाजलेला आहे. चतु:श्रृंगी पोलिसांनी शाम पतंगे याला अटक केली आहे. औंध पोलीस पुढील तपास करीत आहेत.

get_footer();