आवृत्ती पुणे
← Back to Homepage

30 हजाराची लाच घेताना तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

चऱ्होली येथे केली कारवाई : दिघी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हक्क सोडपत्राची नोंद सातबाऱ्यावर करण्यासठी 50 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करुन 30 हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना चऱ्होलीच्या तलाठ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.

ही कारवाई सोमवारी (दि.27) करण्यात आली. मारुती पवार (वय-41) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.

तक्रारदार यांच्याकडील मृत्यूपत्राची व हक्क सोडपत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करायची होती. नोंद करुन देण्यासाठी तलाठी मारुती पवार याने तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये 30 हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केल्यानंतर 23 आणि 24 सप्टेंबर रोजी केलेल्या पडताळणीत पवार याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी (दि.27) सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रुपयाची लाच स्विकारताना मारुती पवार याला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी मारुती पवार याच्यावर दिघी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

get_footer();