आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बनावट पदवी प्रमाणपत्रे देऊन एमआयटीला घातला 57 लाखांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 26, 2022
Spread the love

कोथरूड पोलिसांत फिर्याद : कानपूर विद्यापीठाच्या नावाने दिली पदवी प्रमाणपत्रे, 280 विद्यार्थ्यांची फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : माईर्स एमआयटी युनिव्हिर्सिटीच्या स्कुल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट येथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना दूरस्थ शिक्षण पद्धतीनुसार पदवी देत असल्याचे भासवून त्यांना कानपूरमधील श्री छत्रपती शाहुजी महाराज विद्यापीठाची खोटी व बनावट पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हा प्रकार २०१४ ते २०१८ दरम्यान घडला असून तो आता तब्बल ८ वर्षांनी उघडकीस आला आहे. यामध्ये २८० विद्यार्थ्यांची फी पोटी ५८ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

याप्रकरणी एमआयटीचे विभागप्रमुख जयदिप गुलाबराव जाधव (वय ४३) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महेश रमेश देशपांडे (रा. कोथरुड), स्वप्निल संजय ठाकरे आणि माधव पाटील (दोघे रा. नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, कोथरुड येथील एमआयटीच्या कॅम्पसमध्ये स्कुल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंट ही संस्था आहे. या संस्थेकडे स्वप्निल ठाकरे व माधव पाटील यांनी संपर्क साधून त्यांना आम्ही कानपूरमधील श्री छत्रपती शाहुजी महाराज विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचा दूरस्थ शिक्षणानुसार पदवी अभ्यासक्रम चालवू असे सांगितले. त्यानुसार या ऐच्छिक कोर्ससाठी विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. त्याची फी त्यांच्याकडे भरली. महेश देशपांडे हे समन्वयक म्हणून काम पहात होते. संस्थेने विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन त्यांचे अहवाल ठाकरे, पाटील यांच्याकडे पाठविले. त्यानुसार त्यांनी छत्रपती शाहुजी महाराज विद्यापीठाशी कोणताही संबंध नसताना कानपूर विद्यापीठाच्या नावाने बनावट पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके तयार केली. ती संस्थेला पाठवून विद्यार्थ्यांना देण्यास भाग पाडले. एमआयटीला २०१७ मध्ये अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर विद्यापीठातर्फे हा दूरस्थ कोर्स सुरु करण्याचा विचार सुरु झाला.

त्यावेळी तपासणी केल्यावर फसवणूकीचा हा प्रकार समोर आला. त्यानंतर एमआयटीने अंतर्गत चौकशी समिती स्थापन करुन चौकशी केली. त्यानंतर आता पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात २८० विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून त्यांची फी पोटी ५८ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक झाली आहे.

get_footer();