आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021
Spread the love

उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : मृत्यूचे कारण समजू शकले नाही

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी प्रशिक्षणादरम्यान एका कॅडेटचा मृत्यू झाला. मृत्युचे कारण अद्याप समजू शकले नाही. हा कॅडेट मालदीव येथील असून पुण्यातील एनडीएत सध्या तो प्रशिक्षण घेत होता.

कॅडेट मोहम्मद अहमद (वय 21) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात कलम 174 नुसार नोंद करण्यात आली आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत शनिवारी जोश रनचे आयोजन करण्यात आले होते. ही 12 किमी धावण्याची स्पर्धा होती. त्यात मोहम्मद सहभागी झाला होता. धावताना त्याला चक्कर आल्यासारखे वाटले आणि तो कोसळला त्याला तातडीने एनडीएच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

मोहम्मद हा 12 मार्च रोजी एनडीएच्या 145 व्या तुकडीत दाखल झाला होता. या प्रकरणी एनडीए प्रशासनातर्फे चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तसेच मालदीव वकिलातीला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्याच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कर करण्यात येणार असल्याची माहिती एनडीए प्रशासनाने दिली.

शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार असल्याचे पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांनी सांगितले.

get_footer();