आवृत्ती पुणे
← Back to Homepage

54 वर्षीय नराधमाने 12 वर्षीय गतीमंद मुलीचे केले लैंगिक शोषण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 15, 2021
Spread the love

कोंढव्यातील महिलेनेने दिली फिर्याद : शाळेत ये-जा करताना दोन वर्षे करीत होता घाणेरडा प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शाळेत घेऊन जात असताना वाटेत गाडी थांबवून गाडीचालकच 12 वर्षाच्या गतीमंद मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 2019 पासून 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत हा प्रकार सुरु होता. कोंढवा पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

याप्रकरणी कोंढव्यातील एका महिलेने फिर्याद दिली आहे. नराधम चालक कात्रज परिसरात राहत असून, गाडीवर चालक म्हणून काम करीत होता. फिर्यादी यांची अल्पवयीन गतीमंद मुलगी हिला शाळेत जाताना व शाळेतून येताना चारचाकी गाडीतून तो घेऊन ये जा करीत होता.

त्यावेळी वाटेत गाडी थांबवून हा नराधम तिच्याशी लैंगिक चाळे करीत असे. तिला अश्लिल व्हीडिओ दाखवत असत. त्याप्रमाणे कृत्य करायला भाग पाडत असे. ही बाब तिने आपल्या शिक्षिकांना सांगितल्यावर त्याचे कृत्य समोर आले. गाडीचालकाला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();