आवृत्ती पुणे
← Back to Homepage

५६ वर्षीय आजीवर नातवाकडून चाकूने हल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 4, 2021
Spread the love

लोहियानगरमधील घटना : नशा करण्यासाठी पैसे न दिल्याने उचलले टोकाचे पाऊल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नशेचे व्यसन लागलेल्या नातवाने नशा करण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून आपल्या आजीला मारहाण करुन तिच्यावर चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी लोहियानगरमध्ये राहणाऱ्या एका ५६ वर्षाच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

त्यावरुन खडक पोलिसांनी ( गु. र.क़्र. 365/21) त्यांच्या 18 वर्षाच्या नातवाविरुद्ध 324, 504 कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आजी लोहियानगरमध्ये राहतात. त्यांच्या मुलीच्या मुलाला व्यसन लागले आहे. त्यासाठी तो नेहमी आजीकडे पैसे मागत असतो. तो काही कामधंदा करीत नाही. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता त्याने आपल्या आजीकडे नशा करण्यासाठी पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने आपल्या आजीला लाकडी बांबुने पाठीवर व पोटावर हाताने मारले. बारीक चाकूने डाव्या कानाखाली वार करुन जखमी केले आहे. सहायक पोलीस फौजदार मोढवे तपास करीत आहेत.

get_footer();