आवृत्ती पुणे
← Back to Homepage

57 कोटींचा कर बुडवणाऱ्या बिअर कंपनीला दणका

Spread the love

संचालकांवर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र मुल्यवर्धीत कर कायदा 2002 ची प्रलंबीत थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या ब्रुकाष्ट माइक्रो प्रा.लि. या बिअर बनवणाऱ्या व विक्री करणाऱ्या कंपनीला राज्यकर विभागाने दणका दिला आहे. 57 कोटी 48 लाख 69 हजार 415 रुपयांचा कर बुडवल्याप्रकरणी कंपनीच्या दोन संचालकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सुकेतु दत्तात्रय तळेकर (रा. वार्डन फ्लॅट क्र. 201, बांद्रा) आणि प्रतीक रघुनाथ चतुर्वेदी (रा. शारदा नगर, रायबरेली रोड, लखनौ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्यकर निरीक्षक दिपक साहेबराव शिंदे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी दिपक शिंदे हे येरवडा येथील वस्तू व सेवाकर भावन येथे राज्यकर निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. ब्रुकाफ्ट माइक्रो ब्रुइंग ही कंपनी बिअर बनवणे व व अन्न व बिअर विकण्याचा व्यवसाय करते.

कंपनीचे संचालक सुकेतु दत्तात्रय तळेकर आणि प्रतीक रघुनाथ चतुर्वेदी यांनी महाराष्ट्र मुल्यवर्धीत कर कायदा 2002 च्या कलम 20 नुसार विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक असताना त्यांना वारंवार यासंदर्भात सुचित केले होते.

तसेच कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, कंपनीच्या संचालकांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दोन्ही संचालकांवर कर चुकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे, राज्यकर सह आयुक्त रेश्मा घाणेकर, राज्यकर उपायुक्त सुधीर खेडकर, सहायक राज्यकर आयुक्त निलम भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकर निरीक्षक दिपक शिंदे यांच्या पथकाने केली.

get_footer();