आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवघ्या दहा मिनिटात पावणे दोन लाखांची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021
Spread the love

वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजातून घरातील एक लाख 76 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी राजवाडेनगर, काळेवाडी येथे घडली. हा प्रकार केवळ दहा मिनिटात घडला आहे.

वरूण पिल्ले (वय 28, रा. राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास अनोळखी चोरट्याने फिर्यादी यांच्या घरात उघड्या दरवाजा वाटे प्रवेश केला. घरातील बेडरूममधील लोखंडी व लाकडी कपाट उचकटून त्यातून एक लाख 76 हजार 550 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

get_footer();