विठ्ठलराव वरुडे पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून वयोवृद्ध ,जेष्ठ नागरिकांची अहोरात्र सेवा करणाऱ्या माय माऊली केअर सेंटरचे संस्थापक अध्यक्ष तसेच लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज त्याचबरोबर अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून सामाजाभिमुख कार्य करणारे विठ्ठलराव वरुडे पाटील यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उद्यान प्रसाद हॉल सदाशिव पेठ पुणे येथे राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध विचारवंत ह. भ. प. मा. श्री. शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर व सुप्रसिद्ध साहित्यिक रमेश आव्हाड, इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जे सानिपीना राव विशाखापट्टणम व मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचे पदाधिकारी यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान चिन्ह, गौरव पदक, मानपत्र महावस्त्र, मानकरी बॅच आणि मानाचा फेटा देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड कृष्णाजी जगदाळे यांनी केले होते.
विठ्ठलराव वरुडे म्हणाले, “हा पुरस्कार माझा नसुन मी करत असलेल्या सामाजिक कार्याचा आहे. अशा पुरस्कारामुळे काम करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. पुरस्कार मिळाल्याने मनस्वी आनंद होत आहे. त्यासोबतच एक विशेष सामाजिक जबाबदारी देखील वाढली असून उत्साह देखील वाढला आहे. सामाजिक क्षेत्रात जास्तीत जास्त व सचोटीने काम करण्याचा प्रयत्न राहील. हा पुरस्कार ज्या वृद्धांच्या सेवेमुळे मिळाला त्यांना समर्पित करत आहे, त्याच बरोबर पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकाचे आभार मानतो.
