आवृत्ती पुणे
← Back to Homepage

७६ वर्षीय व्यावसायिकाला ६० लाखाला गंडा घालणारी तरुणी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 12, 2022
Spread the love

पुणे सायबर पोलिसांची कारवाई : पैशाच्या आमिषातून करीत होती फसवणूक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हाय प्रोफाईल महिलांसोबत सेक्स करण्यातून भरपूर पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका महिलेने 76 वर्षाच्या व्यावसायिकाची 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. हा प्रकार मे 2021 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत सुरु होता.

दीपाली कैलास शिंदे (वय 28, रा नेताजीनगर, वानवडी) असे या महिलेचे नाव आहे.

सायबर पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व्यावसायिक आहेत. त्यांनी मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब नावाची जाहिरात पाहून संपर्क केला. त्यात त्यांना क्लब हा श्रीमंत-हाय प्रोफाईल लेडीज सोबत सेक्स करण्यासंदर्भात असून, त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यात आला. फियार्दी यांची श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीजसोबत मिटिंग करुन देण्यासाठी सिक्युरिटी फी भरावी लागेल, असे सांगून सुरुवातील 2 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगून या महिलेने तिच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून एकूण 60 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक केली.

सायबर पोलिसांकडे त्याची तक्रार मिळाल्यावर आरोपीने गुन्ह्यात वापरलेले बँक अकाऊंटची माहिती व इतर माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये आरोपी ही वानवडी येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तिचा शोध घेऊन शिंदे हिला अटक करण्यात आली आहे. शिंदे ही उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविणार असे लोकांना फोनद्वारे सांगण्याचे काम करीत होती व गुन्ह्यामधील रक्कम घेण्यासाठी स्वत:चे बँक अकाऊंटचा वापर केला. शिंदे हिच्या मार्फत हा सर्व कट रचणार्‍या मुख्य आरोपीचा शोध घेतला जात आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगीता माळी, उपनिरीक्षक अमोल वाघमारे, पोलीस अंमलदार राहुल हंडाळ, अंकिता राघो, शुभांगी मालुसरे व निलेश लांडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दरम्यान, सेक्ससाठी महिला पुरविण्याचे आमिष दाखवून गुन्हे करणार्‍यांपासून सावध राहण्याचे सायबर पोलिसांनी आवाहन केले आहे.

get_footer();