आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भारतीय जैन संघटनेतर्फे मोफत ‍प्लॅस्टिक सर्जरी शिबीर

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), News Slider, Other, Social • January 15, 2024
Spread the love

पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल, पुणे व चांदमल मुनोत ट्रस्ट यांचे संयुक्त विद्यमाने ३० वे मोफत प्लॅस्टिक सर्जरी शिबीर दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी संचेती हॉस्पिटल, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले असल्याचे भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था, संचेती हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. पराग संचेती व चांदमल मुनोत ट्रस्ट यांचे अध्यक्ष हस्तीमलजी मुनोत यांनी कळविले आहे.

विश्वविख्यात प्लॅस्टिक सर्जन स्वर्गीय डॉ. शरदकुमार दिक्षित (अमेरिका) यांनी भारतात येऊन ३ लाखा पेक्षा अधिक मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या होत्या. आता मागील १३ वर्षापासून यांच्या स्मरणार्थ देशभरात या शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मानवसेवेचा हा महायज्ञ त्यांचे अमेरिकेतील सुशिष्य प्रसिध्द प्लॅस्टिक सर्जन डॉ. लॅरी वेइंस्टन (अमेरिका) यांनी गेले अनेक वर्षे पुढे चालू ठेवला आहे. येत्या १९ ते २१ जानेवारीच्या या शिबिरामध्ये अंदाजे १५० ते २०० रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये मुख्यत्वे करून दुभंगलेले ओंठ, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यातील विकृती, चिकटलेली हाताची बोटे, फुगलेले गाल अश्या प्रकारच्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात येणार असल्याचे शिबीर प्रमुख शशिकांत मुनोत यांनी कळविले आहे.
हे शिबीर जरी तीन दिवस चालणार असले तरी रुग्णांची नोंदणी व तपासणी फक्त शुक्रवार, दिनांक १९ जानेवारी २०२४ रोजी या एकाच दिवशी सकाळी ९.०० ते १२.०० होणार असून उर्वरित वेळी शस्त्रक्रिया पार पडणार आहेत.
शिबिरा विषयी अधिक माहितीसाठी श्री विजय पारख (98224 24316) नितीन शहा (96049 13296) यांच्याशी संपर्क साधावा.

get_footer();