आवृत्ती पुणे
← Back to Homepage

विवाह विषयक संकेतस्थळावरील ओळख पडली महागात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

महिलेला 16 लाखांचा गंडा : सायबल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे – विवाह नोंदणी संकेतस्थळाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीतून महिलेला 16 लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेने विवाह नोंदणी संकेतस्थळावर तिचे नाव नोंदविले होते. त्यानंतर आरोपीने महिलेबरोबर संपर्क साधला. महिलेबरोबर विवाह करण्यास उत्सुक असल्याची बतावणी केली. त्यानंतर समाजमाध्यमातून दोघांमधील संवाद वाढला. व्यावसायिक असल्याची बतावणी आरोपीने केली होती. एका प्रकल्पासाठी पैसे हवे असल्याचे त्याने तिला सांगितले होते. आरोपीने एका बॅंक खात्यात महिलेला पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेकडून वेळोवेळी 16 लाख रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार दिली.

पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तपास करत आहेत.

get_footer();