आवृत्ती पुणे
← Back to Homepage

८५ हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 31, 2021
Spread the love

चाकण पोलिस ठाण्यातील पीएसआयसह दोघांवर गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खासगी इसमाला 85 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई चाकण पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.29) रात्री केली आहे. अटक करण्यात आलेल्या खासगी व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरुन लाच घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अखत्तर शेखावत अली शेख (वय-35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षाच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्यावर चाकण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज आला आहे. या अर्जावरुन कारवाई न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक झेंडे याने 70 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पुणे एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता खासगी इसम अखत्तर शेख याने झेंडे यांच्यासाठी 70 हजार आणि स्वत: साठी 15 हजार असे एकूण 85 हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी चाकण पोलीस ठाण्यात पथकाने सापळा रचून अखत्तर शेख याला 85 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याने शेख याला लाच घेण्यास मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने झेंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र अद्याप झेंडे यांना अटक करण्यात आलेली नाही.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली. पुढील तपास पोलीस उप अधीक्षक क्रांती पवार करीत आहेत.

get_footer();