आवृत्ती पुणे
← Back to Homepage

स्ट्रॉबेरीतून लाखोंचं उत्पन्न मिळवणाऱ्या उच्च शिक्षित तरूणाची गोष्ट..

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Social • January 9, 2024
Spread the love

नांदेड : 10 गुंठे शेतीत स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला… 6 लाखांच्या उत्पन्नाची हमी, नांदेडच्या तरुण शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग… उच्च शिक्षित तरूण शेती व्यावसायात आला अन् यशस्वी झाला.

शेतीमध्ये उत्पन्न नाही म्हणणाऱ्यांनी ही गोष्ट नक्की वाचाच…
शेती व्यावसाय परवडत नाही. शेतीमध्ये उत्पन्न नाही. शेतीत जास्त गुंतवणूक करावी लागते. पण गुंतवणुकीच्या तुलनेत परतावा मिळत नाही, अशी ओरड आपण नेहमी ऐकतो. पण एका उच्च शिक्षित तरूण शेतकरी बालाजी उपवार यांने नांदेडमधील बारड गावचा उच्च शिक्षण घेतलं. बी.ए झाल्यानंतर त्याने शेतीची वाट धरली. 10 गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली अन् आज त्याला लाखोंचं उत्पन्न मिळू लागलं आहे.
पारंपरिक शेतीला बगल, आधुनिक शेतीची वाट काळाप्रमाणे शेतीत देखील अनेक बदल होताना आपल्याला दिसून येतात . तसेच शेतकरी वर्षानुवर्ष पारंपारिक शेतीत अडकलेला देखील आपण पाहत होतो. मात्र, जसा काळ बदलला तशी शेतीची करण्याची पद्धत देखील बदलत चाललेली आहे. शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. त्यात नांदेडच्या बारड येथील एका सुशिक्षित शेतक-याने पारंपरिक शेतीला बगल देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्ट्रॉबेरीचा नवीन प्रयोग केलाय . 10 गुंठ्यांमध्ये त्यांनी हा प्रयोग केला आहे.
नांदेडमध्ये स्ट्रॉबेरीची शेती बारड इथं राहणारा बालाजी उपवार हा एक अल्पभूधारक प्रयोगशील शेतकरी आहे. त्यांचं शिक्षण बी.ए ग्रॅज्युएशन झाले आहे. हा तरूण शेतकरी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतो. बालाजी उपवार यांनी यंदाच्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहा गुंठे क्षेत्रावर स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे. त्यांनी हे स्ट्रॉबेरीची रोपं महाबळेश्वरवरून आणले होते. नाभिला जातीची ही स्ट्रॉबेरी असून 4000 कलमे त्यांनी आणली होती. या स्ट्रॉबेरीची लागवड करताना त्यांनी संपूर्ण सेंद्रीय पद्धतीचा वापर केला आहे. तसेच त्यांनी ठिबक आणि मलचिंग पेपरचा वापर करून या पिकाची लागवड केली आहे.
स्ट्रॉबेरीची विक्री कशी करणार?
दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीतनंतर स्ट्रॉबेरी काढण्यास आली आहे. बालाजी यांनी थेट बाजारात ही स्ट्रॉबेरी न विकता त्यांनी ‘शेतकरी ते ग्राहक’ या तत्वाचा अवलंब करत थेट आपल्या शेतापुढेच स्टाॅल लावून आणि नांदेड शहरात अनेक भागात सोसायटीमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीची विक्री करत आहेत. त्यामुळे थेट शेतकरी ते ग्राहक स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे.
किती उत्पन्न मिळणार?
प्रतिकिलो 300 रुपये या प्रमाणे सध्या त्याची विक्री होत आहे. थेट शेतकऱ्यांकडून ताजा माल मिळत असल्याने ग्राहक देखील ते आवडीने घेताना पहायला मिळत आहेत. लागवड खर्च दीड लाख रूपये आला आहे. तर 30 किलो स्ट्रॉबेरीची रोज विक्री होत असून 5-6 लाख रूपये उत्पन्न मिळण्याची आशा बालाजी यांनी व्यक्त केली आहे.

get_footer();