आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे विविध भाव मुद्रेतील छायाचित्रे असलेल्या २०२४ दिनदर्शिका चे प्रकाशन..!

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Social • January 9, 2024
Spread the love

पुणे: सरत्या वर्षाला निरोप देऊन आलेल्यार् नववर्षाचे स्वागत केले आहे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्येकाला वर्षभर उपयोगी पडणारी दिनदर्शिका नगरसेवक प्रवीण चोरबेले व मा.नगरसेविका मनीषा चोरबेले यांच्या माध्यमातून तयार केल्या असून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.

यात आपल्या विविध सणांच्या व श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील मंदिराचे छायाचित्रे या दिनदर्शिका मध्ये समाविष्ट केलेले आहे या दिनदर्शिके मध्ये शासकीय सेवा, नेत्र पिढी, रक्तपेढी, पुणे महानगरपालिका हेल्पलाइन, पुणे शहर पोलीस, विविध महिलांच्या संस्था, अग्निशामक केंद्रे, ॲम्बुलन्स सेवा, पुणे शहरातील हॉस्पिटल, महामार्ग वाहतूक पोलीस अशा महत्वकांक्ष मोबाईल नंबर सुविधा करून देण्यात आली आहे व भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे विविध भाव मुद्रेतील छायाचित्रे त्यात समाविष्ट केले आहे.
या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिका चे प्रकाशन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, पर्वती विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आमदार माधुरीताई मिसाळ, भारतीय जनता पार्टी पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे, पुणे शहराचे संघटन मंत्री राजेशजी पांडे, यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुणे शहराचे माजी अध्यक्ष योगेशजी गोगावले, माजी खासदार प्रदीप दादा राऊत, यांच्यासह पुणे शहराचे सर्व नगरसेवक नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();