आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहशत माजविणाऱ्या अजिंक्य शिंदेवर स्थानबध्दतेची कारवाई

Spread the love

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई

पुणे: फरासखाना पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अजिंक्य शिंदे या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

अजिंक्य रामचंद्र शिंदे उर्फ सैय्या आढाव, (वय ३१ वर्षे, रा. ५४९, कसबा पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे पोलीस आयुक्तालयातील फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, अग्नी शस्त्र या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, सुरक्षितता धोक्यात आणणा-या कृतीने दुखापत पोचवणे, बेकायदा अग्नीशस्त्र, बाळगणे बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिकउघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ट पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी.गुन्हे शाखा, चंद्रकांत बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आधिकारी वपोलीसअंमलदार यांनी पार पाडली.
स्थानबध्दतेची ही ७९ कारवाई आहे.

get_footer();