आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुनाला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे आवाहन

Spread the love

पुणे : सिंहगड रोड पोलीसांच्या वतीने खुनाला कारणीभूत ठरलेल्या अज्ञात आरोपी व वाहनाचा शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फिर्यादी मिलिंद फड,(वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं.२०२,क्यु विंग सन युनिवर्स, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे. प्रायेजा सिटी समोरील मुंबई-बेगलोर हायवेच्या मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरील वडगाव ब्रिजवरती, नऱ्हे, येथे फिर्यादी यांचा पुतण्या शुभम फड, (वय-२३ वर्षे) ह्याच्या वाहनाला कोणत्यातरी अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनाने हलगर्जी पणाने धडक दिली. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन, त्याने त्याचे वाहन बेदरकारपणे भरधाव वेगाने चालवुन फिर्यादी यांच्या पुतण्या शुभम याच्या मृत्युस कारणीभुत झाला. तसेच अपघात ठिकाणी कोणतीही मदत न करता, या ठिकाणावरुन पळुन गेला आहे.
या अज्ञात वाहन व वाहन चालक बाबत कोणास काही माहीती असेल तर त्यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर संपर्क क्रं. ०२०२४३४८२७० अथवा मोबाईल क्रं.७०२८०९३४५६ यावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. माहीती देण्यात येणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आले आहे.

get_footer();