आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोलवडीत गूळ व साखरेचा ९ हजार ६२८ किलोचा साठा जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 10, 2021
Spread the love

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई – भेसळ करणाऱ्याबाबत माहिती कळवावी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : कोलवडी (ता. हवेली) येथील बोरमलनाथ गूळ उद्योगातील गुऱ्हाळावर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करून भेसळीच्या संशयावरून ९८ हजार २४० रुपये किंमतीचा ३ हजार ७० किलो गुळ आणि २ लाख २९ हजार ५३० रुपये किंमतीची ६ हजार ५५८ किलो साखर असा ९ हजार ६२८ किलो साठा जप्त करण्यात आला आहे.

पुणे विभागाचे सहआयुक्त शि. स. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अ. ध. झांजुर्णे यांना भेसळीविषयी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार कोलवडीतील बोरमलनाथ येथे गुऱ्हाळावर छापा टाकून कारवाई केली. यापुढेदेखील अन्न व औषध प्रशासनातर्फे अशा स्वरुपाची कारवाई सुरू ठेवली जाणार असून, नागरिकांनी अन्न भेसळीबाबत १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती कळवावी, असे आवाहन परिमंडळ-३चे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई यांनी केले आहे.

get_footer();