आवृत्ती पुणे
← Back to Homepage

खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 30, 2021
Spread the love

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : खुडे ब्रिजखालील नदीपात्रातील मृतदेहाचे रहस्य उलगडले

महाराष्ट्र न्यूज ३६० नेटवर्क

पुणे : एका अज्ञात इसमाचा खुनाच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या दोन आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी जेरबंद केले असून, पोलिसांना खुनाची बातमी सांगणारेच खुनी असल्याचे निष्पन्न झाले.

शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुडे ब्रिजखाली नदीपात्रामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आल्याने पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु सदर मृतदेहाचा अधिक तपास करून तसेच वैद्यकीय अहवाल प्राप्त होताच सदर अज्ञात इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या दाखल गुन्ह्याच्या तपासामध्ये तपास पथकातील अंमलदार यांनी तब्बल २५५ सी.सी.टी.व्ही. फुटेज बघून, तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच रस्त्यावर कचरा वेचणारे, भंगाराचे दुकानदार, भीक मागणारे तसेच गोपनीय बातमीदार असे तब्बल ७० ते ७५ लोकांकडे चौकशी केली. परंतु कोणतेही धागेदोरे किंवा उपयुक्त माहिती मिळून येत नसल्याने तपास अधिकच किचकट बनून आरोपींपर्यंत पोहचण्याचे सर्व रस्ते बंद झाले, असे वाटत असताना दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिता मोरे आणि पोलीस निरिक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक अतुल क्षीरसागर हे स्टाफसह हद्दीमध्ये तसेच परहद्दीमध्ये फिरून तपास करत असताना मिळालेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरून तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे दाखल गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी महेश शिवाजी देव उर्फ तंबी (वय ३०, रा. खुडे ब्रिजजवळ शिवाजीनगर, पुणे) आणि आकाश प्रकाश यादव (वय ३३, रा. नवी शनिवार पेठ पुणे) यास कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असून, सध्या पोलीस कस्टडीत अधिक तपासाकामी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

सदरची कामगिरी ही, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपआयुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई तसेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिता मोरे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) विक्रम गौड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाचे पोलीस उपनिरिक्षक अतुल क्षीरसागर, अर्जुन नाईकवाडे, पोलीस हवालदार अविनाश भिवरे, रणजित फडतरे, बशिर सय्यद, रूपेश वाघमारे, कांतीलाल गुंड, पोलीस नाईक संतोष मेमाणे, पोलीस शिपाई शरद राऊत, अनिकेत भिंगारे, राहुल होळकर यांच्या पथकाने तपास करून उकृष्टरीत्या कामगिरी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक (गुन्हे) विक्रम गौड हे करत आहेत.

get_footer();