आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

चिखलीमधील घटना : मॅट्रीमोनी साईटवरील ओळखीतून लग्नाची घातली मागणी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मॅट्रीमोनी साईटवर ओळख झाल्यानंतर त्याने घरी येऊन लग्नाची मागणी घातली. तिचा विश्वास संपादन करुन तो १ लाख ७० हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झाला. चिखली मध्ये ही घटना घडली आहे.


याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी किरण कालीदास पाटील (वय ४०, रा. विशालनगर, सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी यांची संगम डॉट कॉम या सोशल मॅट्रीमोनी साईटवर १८ जुलै २०२१ रोजी ओळख झाली. त्यानंतर २७ जुलै रोजी आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून ४ तोळ्याचे गंठण, २ तोळ्याची अंगठी, ५० हजार रुपये असा एकूण १ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज घेऊन त्यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक मुंडकर अधिक तपास करीत आहेत.

get_footer();