आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सराईत गुन्हेगार आणि चोरीचे सोने घेणारा सोनार जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 27, 2021
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : चोरून नेलेले ६८ ग्रॅम सोने केले जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : घरफोडीतील सराईत गुन्हेगार आणि चोरीचे सोने घेणारा सोनार या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ६८ ग्रॅम वजनाचे सोने तीन लाख ४० हजार रुपयांचे जप्त केले.

शाहरूख विजय पवार (रा.ता. आटपाडी, जि. सांगली) आणि सोनार प्रकाश रावसाहेब काकडे (रा. ता. आटपाडी, जि. सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ३१ जुलै २०२१ रोजी वडकीतील किरण महादेव सोनवणे (रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) यांचे घर फोडून चोरट्याने ४६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, मोबाईल चोरट्यांनी चोरून नेला होता. दुसरी घटना १४ ऑगस्ट २०२१ रोजी वडकीतील युवराज जगन्नाथ नागवडे (रा. वडकीनाला, ता. हवेली, जि. पुणे) यांचे घरफोडून ५०ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली होती. या गुन्ह्यांचा समांतर तपास लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या पथकाकडून सुरू होता.

दरम्यान, तपास पथकातील नितीन गायकवाड व सुनील नागलोत यांना गुन्हेगाराबाबत माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला लोणी काळभोर गावच्या हद्दीतून ताब्यात घेतले. तपासामध्ये त्याने भाऊ देवगण विजय पवार व साडू तात्या वसंत शिंदे यांच्या मदतीने चोरी करून सोन्याचे दागिने आटपाडीतील सोनार प्रकाश रावसाहेब काकडे यास विकल्याचे सांगितले. त्यानुसार सोनारास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने दोन्ही गुन्ह्यातील सोने खरेदी केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर करीत आहेत.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, अमित साळुंके, श्रीनाथ जाधव, संभाजी देवीकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर, निखिल पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();