आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वानवडी पोलीस स्टेशन हद्दीमधील दोन घटनांत २६ चंदनाच्या झाडांची चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 30, 2021
Spread the love

अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा : पी. जी. रोड परिसरातून २२, तर एस.आर.पी.एफ. ग्रुप.२ मधून ४

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन ठिकाणी २६ चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पहिल्या घटनेत डॉ. कोयाजी रोड येथील आर्मर्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपो, पी. जी. रोड परिसरातील २२ चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना मंगळवारी (दि. २८ ऑगस्ट) सायंकाळी सातच्या सुमारास घडला. दुसरी घटना एस.आर.पी.एफ. ग्रुप.२ मध्ये मंगळवारी (२८ सप्टेंबर) पावणेदहाच्या सुमारास घडली.

मनोजकुमार चौहान (वय ४५, बेकरी लाईन, पुलगेट बसस्टँडजवळ, कॅम्प, पुणे) यांनी वानवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असून, आर्मड फोर्सेस मेडिकल स्टोअर्स डेपो, डॉ. कोयाजीरोड, पुणे येथील पी. जी. रोड परिसरातील २२ चंदनाची झाडे सुमारे २२ हजार रुपये किमतीची अज्ञात चोरट्याने चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस उपनिरीक्षक पी. डी. खरवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार तानवडे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत एसआरपीएफ ग्रुप नं.२मधील चार चंदनाची झाडे चोरून नेली असून, याप्रकरणी भूषण मनोहर देसाई (वय ४२, रा. एसआरपीएफ ग्रुप.२, वानवडी, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, घटनास्थळी वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. मोहिते यांनी भेट देऊन पाहणी केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार रासगे करीत आहेत.

get_footer();