आवृत्ती पुणे
← Back to Homepage

लोखंडी हत्यार व स्टम्पने मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 10, 2022
Spread the love

हडपसर-ग्लायडिंग सेंटरमधील प्रकार : आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल नेला चोरून

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसरमधील पॅराग्लायडिंगमध्ये लघुशंकेसाठी गेलेल्या दोघांना लोखंडी हत्यार व स्टम्पने चौघांनी मारहाण करून आठ हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. ही घटना ६ जानेवारी २०२२ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

कुशल जितेंद्र माळी (वय२२, रा. हांडेवाडी रोड, सातवनगर, हडपसर, मूळ रा. विमाननगर, सुभद्रा निवास, तळोदा, जि. नंदूरबार) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व मित्र हडपसरमधील पॅराग्लायडिंगमध्ये लघुशंकेसाठी गेले. त्यावेळी अंधाराचा फायदा घेत चार अनोळखींनी लोखंडी हत्यार व स्टम्पने मारहाण करून आठ हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला.
अशा घटनांमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने करीत आहेत.

get_footer();