आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अकरा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 26, 2022
Spread the love

हिंजवडी पोलिसांची कारवाई : आईनेच मुलाविरुद्ध दिली पोलिसांत फिर्याद

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हिंजवडी परिसरामध्ये ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गंभीर बाब म्हणजे आरोपीने मुलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी सांगितले की, 35 वर्षीय आरोपी वडील, पीडित 11 वर्षीय मुलगी आणि मुलगा असे तिघे हिंजवडी परिसरात राहतात. तर आरोपीची पत्नी तीन वर्षांपासून वेगळी राहते. मुलं आरोपीकडे राहतात. आरोपीने 13 मार्चला सकाळी मुलीवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 मार्चला पुन्हा तिच्या एकटेपणाचा फायदा घेत अत्याचार केले. या घटनेमुळे मुलगी खूप घाबरली होती. मात्र, आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगायचा कोणाला हे तिला कळत नव्हतं. दरम्यान, धुळवड आणि होळी आल्याने पीडित मुलगी आणि मुलगा यांना आरोपीने आजीकडे गावी सोडले.

होळी आणि धुळवड झाली, तरी मुलगी घरी जाण्यास तयार नव्हती. आजीने नातीला विश्वासात घेऊन काही झालं का? अशी विचारणा केली. त्यावेळी पीडित मुलीने वडील घाणेरडे वागत असल्याचे आजीला सांगितले. आजीने हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या सख्ख्या मुलाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन 35 वर्षीय नराधम बापाला अटक केली आहे.

get_footer();