आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आरोपीला जेरबंद करून सात मोटारसायकली केल्या जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021
Spread the love

नांदेडमधील माळाकोळी पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

मोटारसायकली चोरणाऱ्यास जेरबंद करून त्याच्याकडील सात मोटारसायकल जप्त केल्या. नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत माळाकोळी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी २८ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली.

हरिओम बापूराव मुंडे (वय १९, रा. एकुकां खु., ता. जळकोट, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, नांदे शहर व जिल्ह्यामध्ये मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवळे यांनी गुन्हे शाखेच्या बैठकीमध्ये मोटारसायकल चोरीवर आळा घालण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिते यांनी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीआधारे आरोपीला ताब्यात घेऊन सात मोटारसायकल जप्त केल्या.

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवळे, अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक डोके, पोलीस उपनिरीक्षक गिते, पोलीस हवालदार किरपणे, पोलीस नाईक पल्लेवाड, पोलीस शिपाई मडके, भुरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();