आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आल्हाट टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 6, 2022
Spread the love

अपर पोलीस आयुक्तांनी दिली मंजुरी : पोलीस आयुक्तांकडून 64 वी कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, घरफोडी, हत्यार बाळगणे असे गुन्हे करणार्‍या आणि प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सतत गुन्हे करणार्‍या ऋषभ उर्फ गुड्ड्या युवराज आल्हाट (रा. आरपीएस टॉवर, साठे वस्ती, लोहगाव) याच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाईला अपर पोलिस आयुक्त नामेदव चव्हाण यांनी मंजुरी दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही 64 वी कारवाई केली गेली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आल्हाट सह त्याचे साथीदार शंभू बालाजी कावळे (वय 22) आणि कण भाऊसाहेब राखपसरे (वय 22, दोघेही रा. स्वामी समर्थनगर, साठे वस्ती, लोहगाव) यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली ही 64 वी कारवाई आहे.

दरम्यान, विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यामार्फत अपर पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांना मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार आल्हाट, कावळे आणि राखपसरे यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे. सदरची महत्वाची कामगिरी गुन्हे निरीक्षक मंगेश जगताप, उपनिरीक्षक एस. एस. कोळ्ळुरे व अमंलदार उमेश धेंडे, सूर्या जाधव यांनी केली आहे.

get_footer();