आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 18, 2021
Spread the love

पुण्यातील अलंकार पोलीस चौकीत फिर्याद : मराठी सिनेसृष्टीत खळबळ उडाली

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मराठी अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध त्याच्या पत्नीने मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी, कर्वे रोड) यांनी पुण्यातील अलंकार पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.
करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने जीवे मारण्याची धमकी देऊन गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हाताने मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे.

अनिकेत विश्वासराव याच्याबरोबर त्याच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत विश्वासराव आणि स्रेहा चव्हाण यांचा 2018 मध्ये विवाह झाला आहे. स्रेहा चव्हाण यांनी मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. अनिकेत विश्वासराव हा मुळचा मुंबईचा आहे. गेल्या काही दिवसांपासून स्नेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();