आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अडीच लाखांचा गांजा बाळगणाऱ्यास अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 26, 2021
Spread the love

एकूण सव्वातीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत : लोणीकंद पोलीस स्टेशनामध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे : अडीच लाखांचा गांजा बाळगणाऱ्यास एकास अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली असून, लोणीकंद पोलीस स्टेशनामध्ये गुन्हा दाखल करून १३ किलो गांजा, एक दुचाकी आणि एक मोबाईल असा एकूण सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


मंगळवारी (दि. २४) अमली पदार्थ विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहरकडील पथक लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना वाघोली येथील गायरानवस्ती, वाघेश्वरनगर येथील कचरा डेपो समोरील सार्वजनिक रोडवर नितीन मोहन डुकळे (वय २५, रा. गायरान वस्ती, वाघेश्वरनगर, वाघोली) हा त्याच्या होन्डा ॲक्टिवा गाडीसह संशयितरीत्या मिळून आल्याने त्याचे व सदर दुचाकी वाहनाची झडती घेतली असता, सदर दुचाकीचे मध्यभागी असणाऱ्या नायलॉनचे पोत्यामध्ये विक्रीकरिता बेकायदा बाळगलेला २,६२,५६० रुपयांचा १३ किलो २२८ ग्रॅम गांजा, तसेच ॲक्टिवा ५०००० आणि एक मोबाईल १५००० रुपये, असा एकूण ३,२७,५६० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.


सदरची कारवाई ही, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या सूचनांनुसार अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहरकडील पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस अंमलदार मनोज साळुंके, राहुल जोशी, मारुती पारधी, विशाल दळवी, विशाल शिंदे, रेहाना शेख, नितेश जाधव, योगेश मोहिते यांनी केली आहे.

get_footer();