आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने ९० लाखाला गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 26, 2022
Spread the love

सिंहगड रोड पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील वैद्यकीय कॉलेजमध्ये मुलांना प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने ९० लाख रुपयांना दोन डॉक्टरांना गंडा घालणाऱ्या दोन भामट्यांना सिंहगड रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हा प्रकार बुधवारी (दि.23) दुपारी दोन ते साडेचार या दरम्यान काशिबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज नऱ्हे येथे घडला.

महेंद्र बेदिया एस/ओ धर्मनाथ (वय ३१, रा. झारखंड), करण गौरव एस/ओ रविंद्रकुमार सिन्हा (वय ३१, रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रामचंद्र रखमाजी साळुंके (वय ४८, रा. नवले मेडिकल कॉलेज स्टाफ क्वार्टर, एम बिल्डींग, पुणे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी डॉ. शिवाजी शेंडगे व डॉ. भास्कर जाधव यांना फोन करुन संपर्क साधला. त्यांना पुण्यातील नऱ्हे येथील काशिबाई नवले हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या मुलांचे कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन करुन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. आरोपींनी दोघांकडून प्रत्येकी 45 लाख असे एकूण 90 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. कॉलेजचे नाव घेऊन फसवणूक करुन कॉलेजची बदनामी केल्याप्रकरणी रामचंद्र साळुंके यांनी तक्रार दिली आहे. आरोपी हे काहीही कामधंदा करत नाहीत. ते नऱ्हे येथे राहत असून, लोकांना लिंक पाठवून किंवा त्यांना फोन करुन त्यांच्याशी संपर्क साधत होते. त्यांचे नऱ्हे येथे कॉलसेंटर नसून मुंबईत कॉलसेंटर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार पोलीस तपास करत असल्याचे पोलीस उप निरीक्षक अमोल काळे यांनी सांगितले.

get_footer();