आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अहमदाबाद सीपी बोलतोय असे सांगून पोलिसांना गंडविणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 30, 2021
Spread the love

सामाजिक सुरक्षा विभागाची मुंबई-गोरेगाव येथे केली कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मी अहमदाबाद सीपी विजयसिंग बोलतोय… असे सांगून पिस्टलची माहिती देण्याच्या बहाण्याने पोलिसांना गंडा घातल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आरोपीच्या गोरेगाव येथून मुसक्या आवळल्या आहेत. हा प्रकार 8 ते 28 डिसेंबर या कालावधीत घडला आहे.

खलीलुल्ला अयनुल्ला खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपीने पोलीस नियंत्रण कक्षात फोन करुन मी विजयसिंग अहमदाबाद पोलीस आयुक्त बोलतोय, आपल्या आयुक्तांचा नंबर द्या, असा फोन आल्याने नियंत्रण कक्षातील पोलिसांनी पोलीस आयुक्तांचा नंबर दिला. त्यानंतर आरोपीने पुन्हा फोन करुन आयुक्तांना वारंवार फोन करत आहे. मात्र, ते माझा फोन उचलत नसल्याचे सांगून पिंपरी चिंचवडमध्ये पिस्टलाची डिल करणाऱ्यांची माहिती देयची असल्याचे सांगून गुन्हे शाखेच्या पोलीस आयुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षकांचे फोन नंबर मागितले. त्यानुसार नियंत्रण कक्षातून आरोपीला फोन नंबर देण्यात आले. त्यानंतर आरोपीने पुन्हा नियंत्रण कक्षात फोन करुन आयुक्त फोन उचलत नसल्याचे सांगितल्याने त्याला सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण आणि सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांचा नंबर देण्यात आला. आरोपीने डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता डोंगरेंनी पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे यांचा नंबर दिला. आरोपीने सिसोदे यांना संपर्क करुन आपण पोलीस आयुक्तांचा व पोलिसांचा गुप्त बातमीदार बोलत असल्याचे सांगून पिंपरी चिंचवडमध्ये 4 ते 5 पिस्टलची विक्री होणार असल्याचे सांगून त्यांना फोटो आणि विक्री करणाऱ्याचे खोटे फोटो पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 15000 हजार रुपयांची मागणी करुन स्टेट बँक ऑफ इंडिया खाते नंबर, बँक डिटेल्स पाठवले.

दरम्यान, आरोपीने पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना वारंवार फोन केला. त्यामुळे त्यांना संशय आल्याने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करुन एक पथक गोरेगाव येथे पाठवले. पोलिसांनी आरोपीला बोलण्यात गुंतवून ठेवून त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रथम 15 आणि नंतर 9 हजार असे एकूण 24 हजार रुपये पाठवून गोरेगाव येथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता आरोपीने मलाड पोलीस स्टेशन, गोरेगाव पोलीस स्टेशन आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले.

आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत…

आरोपी ऑनलाईन पद्धतीने पोलीस नियंत्रण कक्षाचे फोन नंबर प्राप्त करत होता.त्यानंतर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नंबर घेत होता. त्यांच्याशी संपर्क साधून पिस्टल संदर्भात काम असल्याची खोटी बतावणी करुन तुमच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या चांगल्या अधिकाऱ्यांचे नंबर द्या मी त्यांना आरोपींना पकडून देतो असे सांगत होता. त्यानंतर दुय्यम पोलिसांना फोन करुन खोटे फोटो पाठवून पोलिसांकडून 10 ते 15 हजार रुपयांची मागणी करत होता. पैसे मिळाल्यानंतर पोलिसांना उडवा-उडवीची उत्तरे देऊन काम पुढे ढकलले असल्याचे सांगून फोन बंद करत होता. आरोपी 2015 पासून असे गुन्हे करत होता.

सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील करीत आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाननंद, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंह सिसोदे, धैर्यशिल सोळंके, पोलीस अंमलदार मच्छिंद्र घनवट, विजय कांबळे, किशोर पढेर, संतोष बर्गे, सुनील शिरसाट, नितीन लोंढे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, अतुल लोखंडे, योगेश तिडके, नितेश बिच्चेवार, नागेश माळी, भगवंता मुठे, वैष्णवी गावडे, राजेश कोकाटे, सोनाली माने, अमोल साडेकर, सुमित डमाळ, अमोल शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();