आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अजित पवारांच्या पीएशी ओळख असल्याचे सांगून दहा लाखाला गंडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 4, 2022
Spread the love

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : पोलिसांनी वाईमध्ये एकाला ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करुन पुणे शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव भूषण गगराणी यांचे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांच्या पीए नावाने 10 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या.

प्रविण विठ्ठल जगताप (रा. वाई, सातारा – Satara) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या अन्य एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महेश विश्वास पटवर्धन (वय – 42 रा. राजयोग सोसायटी, वारजे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, पुणे महापालिकेमार्फत विविध विकास कामे केली जातात. त्यापैकी 5 कोटी रुपयांचे बजेट लॉकिंग करुन देतो. माझी मुसळे यांच्याशी ओळख आहे. तुमचे काम होऊन जाईल, असे स्वत:ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाशी ओळख असल्याचे आरोपी आणि त्याच्या साथिदाराने फिर्यादी यांना सांगितले. तसेच भूषण गगराणी आणि त्यांचे पीए हेमंत केसळकर यांच्यासोबत देखील ओळख असल्याचे फिर्यादी पटवर्धन यांना सांगितले. फिर्यादीने आरोपींवर विश्वास ठेवून त्यांना 10 लाख रुपये दिले. मात्र, पैसे देऊनही काम करत नसल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी प्रवीण जगताप याला अटक केली. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहे.

get_footer();