आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अंमली पदार्थ विक्रेत्या दोघा इसमांना अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 29, 2023
Spread the love

एल.डी.एस पेपर, ओझीकुश गांजा आणि एमडीएमए गोळ्यांसह १ लाख ६६ हजारांचा माल जप्त

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे : बालेवाडीतल्या दसरा चौकात अमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या तनुज कामव्रत, वय २२ वर्षे राहणार कोथरूड व जीवन टोटन वय २० वर्षे राहणार बाणेर या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून १ लाख ४६ हजार किंमतीचे एल.एस.डी पेपर, ओझीकुश गांजा व एम.डी.ए च्या गोळ्या तसेच २० हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ६६ हजार रूपयांचा माल जप्त करून त्यांना अटक करण्यात आली.
चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करताना पोलिस अंमलदार सहायक पोलिस फौजदार शिवाजी घुले यांना याविषयी माहिती मिळाली होती. अटक केलेल्या दोघांविरूद्ध चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हे विभागाचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, गुन्हे २ चे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके, सहायक पोलिस फौजदार घुले, पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमदांडी, संदीप जाधव, चेतन गायकवाड, मयूर सूर्यवंशी, महेश साळुंखे, साहिल सय्यद शेख, नितीन जगदाळे, आजीम शेख, युवराज कांबळे, योगेश मांढरे, दिनेश बस्तेवाड, दिशा खेवलकर या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();