आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अँटी करप्शनने पालिका कॉन्ट्रॅक्टरला लाच घेताना रंगेहात पकडले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 30, 2022
Spread the love

पुणे मनपाच्या सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंत्याला पैसे द्यावे लागतात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : नळजोड देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागून १७ हजार रुपये लाच घेताना पुणे मनपाच्या कॉन्ट्रॅक्टरला (खासगी व्यक्ती) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (मंगळवार, दि. २९ मार्च २०२२) कारवाई केली.

महेश तानाजी शिंदे (वय ४६) असे लाचखोर कॉन्ट्रॅक्टरचे नाव आहे. याप्रकरणी ५४ वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांच्या संबंधितांच्या मिळकतीमध्ये पाण्याचे कनेक्शन देण्याकरता तक्रारदार यांनी पुणे महापालिकेत अर्ज केला होता. पुणे महापालिकेकडून पाणी कनेक्शन मंजूर करुन देण्यासाठी महेश शिंदे याने तीस हजार रुपयाची लाच मागितली होती.

त्यापैकी १५ हजार रुपये त्याने सुरुवातीला घेतले होते. त्यानंतर उर्वरित १५ हजार रुपये शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे मागितले. तक्रारदार यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे महेश शिंदे याच्या विरोधात तक्रार दिली. पुणे एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता आरोपी महेश शिंदे यांने सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता मनपा पुणे यांना पैसे द्यावे लागतात असे म्हणून १७ हजार रुपयाची लाच मागितली. पथकाने सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना आरोपी महेश शिंदे याला रंगेहात पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रणेता संगोलकर, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे, पोलीस हवालदार अयाचित, पोलीस कॉन्स्टेबल भूषण ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();