आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अमली पदार्थ विरोधी कारवाईत सुमारे चाळीस लाखाचा मुद्देमाल जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 6, 2023
Spread the love

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : येथील कोंढवा पोलिस हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असलेल्या अमली पदार्थ विरोधी पथक 2 चे पोलिस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने केलेल्या कारवाईत सुमारे 40 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

कोंढव्यातल्या इनाम नगर गल्लीत राहणाऱ्या शाहिद शेख, 49 वर्षीय इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडील एकूण 40 लाख 33 हजार 200 रूपये किंमतीची 336 ग्रॅम ब्राउन शुगर, 10 हजार रूपये किंमतीचा अँड्रॉईड मोबाईल आणि रोख सोळाशे रूपये असा एकूण 40 लाख 44 हजार 800 रूपयांचा मुद्देमाल पकडला. शेख विरूद्ध कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला कोंढवा पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त. रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त अमोल झेंडे, गुन्हे 2 चे सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक नरके, ASI घुले, पोलिस हवालदार चेतन गायकवाड, मांढरे, कांबळे तसेच महिला पोलीसनाईक दिशा खेवळकर व बस्टेवड यांनी ही कारवाई पार पाडली.

get_footer();