आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अट्टल गुन्हेगार औरंगाबाद कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 12, 2022
Spread the love

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ६४ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत तब्बल 64 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

संदीप कमलाकर चव्हाण (वय-42 रा. सादडी सदन, गणेश पेठ) असे स्थानबद्ध केलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.

संदीप चव्हाण हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून, त्याने त्याच्या साथीदारांसह फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, पालघन, चाकू, गुप्ती यासारख्या हत्यारांसह फिरत असताना गंभीर दुखापत करणे, विनयभंग, सरकारी कामात अडथळा, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संदीप चव्हाण याच्यावर एमपीडीए ॲक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली.

सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्का, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

get_footer();