आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बाप रे… खडकवासलाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये तरुणांचे आढळले मृतदेह

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 4, 2022
Spread the love

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये दोन 23 वर्षीय तरूणांचे मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. धरण परिसरातील नागरिक येथील मोर्‍यांमध्ये कपडे धुण्यासाठी गेले असताना हा प्रकार उघडकीस आला. नागरिकांनी धरणाच्या सुरक्षारक्षकांना माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी घटनास्थळावर धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

विजय नागनाथ रोकडे (वय 23) आणि रॉबिन कुबेर वाघमारे (वय 23) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही तरूण दिवसांपासून बेपत्ता होते. मृत दोन्ही तरूण वारजे माळवाडी परिसरात राहत होते. दोन दिवसांपूर्वी ते दोघे एकत्र घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परलेच नाहीत. या दोघांचा धरणात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मयत तरूणांच्या सोबत असलेल्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दोन्ही तरूणांच्या मृत्यूमागे इतर काही कारण आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

get_footer();