आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बाप रे… पोलिसानेच दिली पोलिसाचा गेम करण्यासाठी सुपारी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 2, 2022
Spread the love

सराईत गुन्हेगार जेरबंद : मोबाईल तपासल्यानंतर घटना आली उघडकीस

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहर पोलिस दलातील फरासखाना पोलिस ठाण्यामधील एका पोलिस कर्मचार्‍याने दत्तवाडी पोलिस ठाण्यामधील दुसर्‍या पोलिस कर्मचार्‍याच्या खूनाची सुपारी दिल्याने खळबळ उडाली आहे. सराईत गुन्हेगाराच्या मोबाईल तपासणीवरून ही घटना उघडकीस आली. सराईत गुन्हेगार आणि पोलिस कर्मचार्‍यात डील झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. परंतु वेळीच दत्तवाडी पोलिसांनी कट हाणून पाडला आहे.

याप्रकरणी सराईत गुन्हेगार योगेश प्रल्हाद आडसूळ (35, रा. कोहेपडळ रेल्वे गेट जवळ, एकता कॉलनी, हडपसर) याला अटक केली आहे. यामुळे संपुर्ण पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, योगेश आडसूळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो नुकताच खुनाच्या गुन्हयातून पॅरोलवर बाहेर आला आहे. पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन दुधाळ हा फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. पोलिस कर्मचारी दिनेश दोरगे हे दत्तवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. दिनेश दोरगे यांची सुपारी देण्यात आली होती. याबाबत फिर्याद पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील बाळासो लोहार यांनी दिली आहे.

याबाबत माहिती अशी, पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ आणि दिनेश दोरगे या दोघांत वैयक्तिक कारणातून वाद झाला होता. दुधाळ याने दोरगे यांच्या खूनाची सुपारी सराईत गुन्हेगार योगेश आडसूळ याला दिली होती. दिनेश दोरगे यांचा अपघात घडवून त्यांना कायमचे अपंगत्व आणण्याचा कट आरोपींनी रचला होता असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, यामध्ये दोरगे यांचा मृत्यू झाला तरी दुधाळ हे सर्व पाहून घेणार होता. दरम्यान, हडपसर येथे नितीन दुधाळ याने आडसूळ याची भेट घेऊन ही सुपारी दिली.
पण, सराईत गुन्हेगारांच्या झाडाझडती दरम्यान अडसूळ याला पोलिसांनी अटक केले. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता काही संशयास्पद माहिती पोलिसांना लागली होती. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रसाद डोंगरे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

get_footer();