आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बाप रे… शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुणांचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 4, 2022
Spread the love

लोणीकाळभोर परिसरातील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शौचालयाची टाकी साफ करताना चार तरुण टाकीत पडल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली, जि.पुणे) परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सिकंदर पोपट कसबे, पद्माकर मारुती वाघमारे, कृष्णा दत्ता जाधव, रुपेश कांबळे असे मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत.

पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील हॉटेल प्यासाजवळ असलेल्या परिसरात ही घटना घडली. एका घराची शौचालयाची टाकी साफ करण्यासाठी तरुण आले होते. 10 ते 12 फुट खोल असलेल्या टाकीमध्ये सुरुवातीला 2 तरुण पडले, त्यानंतर इतर दोन जण टाकीत पडले. टाकीत गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच केंद्र अधिकारी विजय महाजन, वाहन चालक माने नितीन, विकास पालवे, अभिजित दराडे, उमेश फाळके, मुस्तक तडवी, मयूर गोसावी, चेतन खमसे, प्रशांत अडसूळ, ओम पाटील, अक्षय नेवसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी अथक परिश्रम घेऊन चार तरुणांचे मृतदेह टाकीतून बाहेर काढले.

get_footer();