आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बाबाशेठ मिसाळ यांना धमकी देऊन खंडणी मागणारा अटकेत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 1, 2022
Spread the love

बिबवेवाडी पोलिसांची कारवाई : गुगल पे द्वारे केली होतीपैशांची मागणी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भाजपचे नेते माजी नगरसेवक बाबशेठ मिसाळ यांना फोन करून व मॅसेज पाठवून गुगल पे द्वारे पैशांची मागणी करुन पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला. बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. या बाबत ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी इम्रान समीर शेख, रा. ७९, विकासनगर, घोरपडीगावं, पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. माजी नगरसेवक बाबाशेठ ऊर्फ दिपक धोडीबा मिसाळ,यांना त्याने धमकी देऊन पैशाची मागणी केली होती. दरम्यान त्यांचा स्वतःचा संपर्क क्रमांक तसेच त्यांची भावजई आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयातील जनसंपर्कासाठीचा संपर्क क्रमांक यावर याने अनोळखी क्रमांकावरुन फोन करून तसेच मॅसेज पाठवून गुगल पे द्वारे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास फिर्यादी दिपक मिसाळ यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे), अनिता हिवरकर करीत असताना अनोळखी आरोपीने फिर्यादी यांना खंडणी मागण्यासाठी व धमकावण्यासाठी वापरलेले मोबाईल क्रमांकांची माहीती घेवून त्याचे तांत्रिक विश्लेषन करून सदरचे क्रमांकांपैकी एक मोबाईल क्रमांक वापरणारा अनोळखी इसम हा इम्रान समीर शेख, रा. ७९, विकासनगर, घोरपडीगावं, पुणे येथील असल्याचा तपासात निष्पन्न झाले. त्याचा तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रविण कालुखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी स्टाफसह प्राप्त पत्यावर शोध घेतला असता, तो राहते घर सोडून गेला आहे अशी माहीती मिळाली. तक्रारीतील प्राप्त मोबाईल क्रमांकाचे सखोल तांत्रिक विश्लेषन करून आरोपी हा कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथे असल्याची माहीती प्राप्त झाली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलीस ठाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण काळूखे व पोलीस हवालदार शाम लोहोमकर, पोलीस अंमलदार सतीश मोरे, तानाजी सागर यांनी तात्काळ कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथे जावून गोपनिय माहीती मिळवून आरोपी इमान शेख याचा शोध घेतला. तो मिळाल्यावर त्याच्याकडे तपास करता त्याने दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले व तसे तपासात निष्पन्न झाले. आरोपीस कामारेड्डी, तेलंगणा राज्य येथून पुणे येथे आणून दाखल गुन्ह्यात न्यायालयाने दि. ०३/१०/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडीची रिमांड मंजूर केली आहे. आरोपीने गुन्ह्याचे कामी वापरलेले मोबाईल फोन व सिमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
सदरची कामगिरी नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त  परिमंडळ-०५, पुणे शहर, पौर्णिमा तावरे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनानुसार संगिता जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाणे यांच्या सुचनेप्रमाणे अनिता हिवरकर, यांनी केली आहे. पुढील तपास अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), या करीत आहेत.

get_footer();