आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बहिणीच्या प्रेमीकावर कोयत्याने वार करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 22, 2022
Spread the love

दिघी पोलिसांत फिर्याद : पुण्यात झाली सैराटची पुनरावृत्ती

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : प्रेमाने आंधळे झालेल्या बहिणीने पळून जाऊन लग्न केल्याच्या रागातून भावाने त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्रेमवीरावर भररस्त्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर बहिणीला घेऊन गेले. ही घटना रविवारी (दि.20) सकाळी आठच्या सुमारास दिघी येथील मॅगझीन चौकातील सार्वजनिक रोडवर घडली. याप्रकरणी चार जणांवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शुभम नवनाथ बरकडे (वय-22 रा. मु.पो. लिंब ता. कोरेगाव, जि. सातारा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रोहित भोसले (वय-24), गणेश भोसले (वय-23 दोघे रा. मु.पो. अपशिंगे, ता. कोरेगाव, जि. सातारा) आणि त्यांचे इतर दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शुभम बरकडे आणि आरोपी रोहित भोसले याची बहिण यांच्यामध्ये प्रेमसंबंध आहेत. दोघांनी प्रेमविवाह केला आहे. बहिणीला पळवून नेऊन तिच्यासोबत लग्न केल्याचा राग आरोपी रोहित भोसले याच्या मनात होता. रविवारी सकाळी जोडपे आणि त्यांचा मित्र मंगेश खंडझोडे हे रिक्षातून स्वारगेट येथे जात होते. मॅगझीन चौकात आरोपींनी त्यांची चारचाकी गाडी रिक्षाला आडवी घालून रिक्षा थांबवली. त्यानंतर आरोपींनी मंगेश खंडेझोड याला रिक्षातून बाहेर ओढून मारहाण केली. त्यानंतर आरोपी रोहित भोसले याने त्याच्या बहीणी सोबत फिर्यादी शुभम याने लग्न केल्याच्या कारणावरुन सोबत आणलेल्या कोयत्याने डोक्यात वार करुन जखमी केले. तसेच, बहिणीला सोबत घेऊन गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.

get_footer();