आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून अडीच लाखांवर चोरट्यांचा डल्ला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 16, 2022
Spread the love

चतु:श्रृंगी पोलिसांत फिर्याद : वडारवाडीतील कुसाळकर इमारतीमध्ये झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्याने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. वडारवाडीतील कुसाळकर इमारतीमध्ये १२ जानावेरी २०२२ रोजी सकाळी पावणेअकरा ते दुपारी पावणेएकच्या दरम्यान घरफोडी झाली.

याप्रकरणी उत्तम मडल (वय ३९, रा. वडारवाडी, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगिलते की, वडारवाडी येथील कुसाळकर इमारतीमध्ये फिर्यादीचा फ्लॅट कुलूपबंद होता. अज्ञात चोरट्याने कुलूप उचकटून दोन लाख ३३ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रुपेश टेमगिरे पुढील तपास करीत आहेत.

get_footer();