आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बंदीजनांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेसंदर्भात गृहमंत्र्यांसमवेत बैठक

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • March 30, 2022
Spread the love

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यातील जेलमधील बंदीजनांसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये २९ मार्च २०२२ रोजी बैठक झाली.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सदर भजन स्पर्धेच्या नियोजना संदर्भात राज्याचे तुरुंग महानिरीक्षक कुलकर्णी यांच्यासमवेत बैठक होणार आहे. यासाठी गृहमंत्र्यांसमवेत नुकतीच बैठक झाली. याप्रसंगी राज्याचे गृहसचिव लिमये, उपसचिव गद्रे, महानिरीक्षक कुलकर्णी, राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्याबरोबर शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, राज्याचे उपाध्यक्ष नंदकुमार बंड, विश्वस्त शेखर पाटील, संगीत क्षेत्रातील दिग्गज औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे आणि विवेक थिटे उपस्थित होते.

get_footer();