आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बापरे… तरुणीला घरात शिरुन दिले सिगारेटचे चटके

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 8, 2022
Spread the love

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : रिक्षाचालकाने वेगवेगळ्या ठिकाणी केला भयावह प्रकार

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी एका तरुणीवर बळजबरी करत सिगारेटचे चटके दिल्याचा भयावह प्रकार समोर आला. या प्रकाराची माहिती मिळताच संपूर्ण शहर पोलीस दलात खळबळ माजली. अधिक चौकशीत घडलेला प्रकार खरा असला तरी ठिकाण वेगळे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी सांगितले की, एका तरुणीने फर्ग्युसन कॉलेज येथे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसली. रिक्षाचालक तसेच पाठीमागील बाजूस एक जण बसला होता. रिक्षा सुरु झाल्यानंतर पाठीमागे बसलेल्याने फिर्यादीच्या गळ्यात हात टाकून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादी यांनी रिक्षा थांबविण्यास सांगितले असताना त्याने कमी वर्दळीच्या भागात रिक्षा थांबविली. फिर्यादीच्या पाठीमागे येऊन त्यांचे दोन्ही हात पकडले. फिर्यादीच्या शेजारी बसलेल्याने त्यांच्यासोबत बळजबरी करु लागल्याने त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याने हातामधील पेटत्या सिगारेटने फिर्यादीच्या डाव्या हाताचे दंडाला चटका देऊन त्यांना जखमी केले. फिर्यादी यांच्या छातीत व पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन रिक्षा घेऊन ते पळून गेले, असे या तरुणीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संपूर्ण परिसरात तातडीने तपासणी करुन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. परंतु, प्रत्यक्षात असे काही आढळले नाही. तिच्या अंगावर चटके दिल्याचे डाग तर दिसत होते. मात्र, तिच्या बोलण्यातही विसंगती आढळून आली. तेव्हा तिला महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विश्वास घेतले असता तिने खरा प्रकार काय घडला, याची माहिती दिली.

आपल्या घरी कळू नये, म्हणून तिने वेगळी कथा सांगितली. प्रत्यक्षात हा प्रकार हिंजवडीमध्ये ती इंटरव्ह्युसाठी आली असताना घडला होता. हे समजल्यानंतर पोलिसांनी तिला हिंजवडी पोलीस ठाण्यात पाठविले. तेथे तिची विनयभंगाची फिर्याद दाखल करुन घेण्यात आली आहे. ही १८ वर्षाची तरुणी मुळची अकोला येथील राहणारी आहे. ५ एप्रिल रोजी दुपारी ती घरात असताना दोन अनोळखी तरुण तिच्या रुममध्ये आले. त्यांनी पाण्याचा कॅन घ्यायचा आहे, असे सांगितले. तो आत आला. त्याने फिर्यादी तरुणीला मिठ्ठी मारली. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला घरातील स्टीलचा झारा फेकून मारला. तेव्हा त्याने दुसऱ्या साथीदाराला बोलावले. त्याने फिर्यादी यांच्या पायावर बसून हात धरुन तोंड दाबून आमच्या इच्छेने करुन दे की, जाळून टाकू, असे म्हणाला. दुसर्‍याने त्याच्या हातातील सिगारेटने चटका देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी हिने झटका दिल्याने सिगारेट खाली पडली. त्यानंतर त्यांनी झारा गरम करुन फिर्यादीच्या डाव्या दंडावर चटका दिला. पहिल्याने अश्लिल वर्तन करुन फिर्यादीचे जबरदस्तीने कपडे काढून, पायाला किस करण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. या दरम्यान हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात त्यातील एक आरोपी हा फिर्यादीच्या ओळखीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

get_footer();