आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बारा मोबाईल व दोन स्मार्ट वॉच चोरणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 15, 2022
Spread the love

मुंढवा पोलिसांत फिर्याद : ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रा. कंपनीच्या घोरपडी शाखेत झाली चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बारा वेगवेगळ्या कंपन्यांचे १२ मोबाईल आणि दोन स्मार्ट वॉच असा एकूण तीन लाख ६० हजार ९५५ रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या कामगारावर गुन्हा दाखल केला आहे. ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या व्हेअर हाऊसच्या घोरपडी शाखेत १८ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री आठच्या सुमारास हा चोरीचा प्रकार उघडकीस आला.

संदीप पाटील (वय ३७, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, घोरपडी येथे ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रा. लि. येथे ऑपरेशन मॅनेजर पदावर फिर्यादी कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगाराने १२ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल व दोन स्मार्ट वॉच असा एकूण तीन लाख ६० हजार ९५५ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कोळेकर पुढील तपास करीत आहेत.

get_footer();