आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार स्पर्धेत पुणे पोलीस आयुक्तालयास प्रथम क्रमांक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 17, 2021
Spread the love

महासंचालक कार्यालयच्या स्पर्धेचा निकाल जाहीर : २४ घटकांतील मूल्यांकनात राज्यात अव्वल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार स्पर्धेत २४ घटकांतील मूल्यांकनात अव्वल येत पुणे पोलीस आयुक्तालयने प्रथम क्रमांक मिळविला आहे. महासंचालक कार्यालयच्या स्पर्धेचा जाहीर झालेल्या निकालात पुणे पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पद्धतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्ह्याचा तपास, त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या संबंधित पोलीस अधिकारी / अंमलदार यांना प्रोत्साहित करणे इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

या स्पर्धेच्या अनुषंगाने कामाच्या मूल्यांकनाचे निकष सकारात्मक-नकारात्मक मापदंड इत्यादीच्या अनुषंगाने घटकातील पूर्ण वर्षात दाखल गुन्ह्यांची माहीती विचारात घेऊन ज्या पोलीस घटकांचा भादंवि कलमांन्वये गुन्हे ६००० पेक्षा जास्त आहे, अशा एकूण २४ घटकांची एक श्रेणी तयार करण्यात आली होती, त्यांच्या कामगिरीच्या मूल्यांकनासाठी तयार करण्यात आलेल्या निवड समितीमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाकडील अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अध्यक्ष व इतर सदस्य म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे, पोलीस अधीक्षक, जळगाव व पोलीस अधीक्षक कोल्हापूर हे अधिकारी होते. २४ घटकांमध्ये करण्यात आलेल्या मूल्यांकनामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेला आहे.

खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या या प्रमुख गंभीर शीर्षाखाली वर्षभरामध्ये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपासावर प्रलंबित राहणाऱ्या गुन्ह्यांची संख्या, अवैध धंद्यावरील प्रभावी कारवाया ( पिटा कायदा, अंमली पदार्थ विरोधी कायदा, बेकायदा शस्त्रे बाळगणे) माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये दाखल होणारे गुन्हे, गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कारवाई (मोका, एम पी डी ए, तडीपार इत्यादी ), दीर्घ काळापासून फरार असलेले आरोपी पकडणे, दुर्बल घटकांविरुद्ध दाखल गुन्ह्यांची तात्काळ निर्गती करणे, हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणे, महिला व बालके अत्याचारांविरूद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत विहीत कालावधीत कार्यवाही करणे, न्यायालयाच्या समन्स, वॉरंटची बजावणी, शिक्षेच्या प्रमाणातील वाढ, अपघाताची संख्या कमी करणे, मुद्देमालीची निर्गती करणे, श्वान पथक व अंगुली मद्रा यांचा वापर करून तांत्रिक तपास करणे तसेच प्रशासकीय कामकाज जलद गतीने करणे. (परेड, निवृत्ती वेतन विषयक कामे, विभागीय चौकशी, वैद्यकीय देयके, प्रशिक्षण व पदोन्नती) या व्यतिरिक्त जातीय व सामाजिक सलोखा ठेवणे, महिलांच्या सुरक्षेसाठी विविध योजना राबविणे तसेच वाहतुक सुरक्षित व सुरळित होईल यासाठी नियोजन करणे इत्यादी विविध मुद्दयांसाठी निवड समितीने मूल्यांकन करून भादवि कलमांन्वये ६००० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या एकूण २४ घटकांमधून पोलीस आयुक्तालय, पुणे शहर या घटकाची ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’ (Best Police Unit) म्हणून निवड करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, पश्चिम प्रादेशिक विभाग, गुन्हे, प्रशासन व सर्व पोलीस उपआयुक्त यांनी केलेल्या भरीव कामगिरीमुळे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला ‘सर्वोत्कृष्ट पोलीस घटक’चा बहुमान प्राप्त झालेला आहे.

चांगले काम करायचे, असे ठरवून आम्ही काम केले नाही. प्रत्येक वेळी अधिक चांगले काम करण्यावर आमचा भर असतो. त्या दृष्टीने प्रयत्न केले. सगळे काम केल्यानंतर अधिक चांगले काम कसे करायचे, हे आम्हाला या पुरस्कारामुळे कळले. या पुढेही असेच चांगले काम करू.
-अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त

get_footer();