आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भाचीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या काकाला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 23, 2021
Spread the love

पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरातील घटना :पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 50 वर्षाच्या काकानेच आपल्या अल्पवयीन भाचीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मागील वीस दिवसांपासून ते बुधवार (दि.20) या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने (वय-37) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा मावस दिर आहे. पीडित मुलगी दुकानात जात असताना आरोपीने तिला जवळ बोलावून घेत तिच्यासोबत अश्लील चाळे केले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, पीडित मुलीच्या वडिलांनी जाब विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच पीडित मुलीकडे पाहून अश्लील हातवारे करुन चुंबन देण्याचा इशारा करुन विनयभंग केला.

आरोपी विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास विश्रांतवाडी पोलीस करीत आहेत.

get_footer();