आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भाजीचा स्टॉल लावण्यावरून तरुणावर कोयत्याने वार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 15, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : कोंढव्यातील शांतीनगर सोसायटीसमोर घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रस्त्यावर भाजीचा स्टॉल लावण्यावरून जागेच्या वादातून दोघा मायलेकाने एका तरुणावर कोयत्याने व चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. ही घटना कोंढव्यातील शांतीनगर सोसायटीच्या मेनगेटसमोरील फुटपाथवर रविवारी सकाळी साडे आठ वाजता घडली.

सद्दाम मोईनुद्दीन शेख (वय २४) आणि शायनाबानु मोईनुद्दीन शेख (वय ५०, रा. अप्पर बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवम दत्तात्रय जगदाळे (वय ३०, रा. साईनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, शिवम जगदाळे व आरोपी यांच्यात फुटपाथवर भाजीचा स्टॉल लावण्याकरीता जागेवरुन वाद झाला. त्यात शायनाबानु हिने फिर्यादीस शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. सद्दाम हा हातात कोयता घेऊन आला. फिर्यादीच्या स्टॉलला लाथ मारुन “इधर तू कैसे धंदा करता मै तेरे को अभी इधरही काट डालता हूॅ” असे म्हणून त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीस मारु लागला. त्यात फिर्यादीच्या डाव्या पायावर, कमरेवर जखमा झाल्या. डोक्यात वार करीत असताना फिर्यादीने हातमध्ये घातला असता हाताच्या बोटावर कोयता लागून तो जखमी झाला. शायनाबानु हिने भाजी कापण्याच्या चाकूने फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन शिवीगाळ केली. सहायक पोलीस निरीक्षक मोहिते तपास करीत आहेत.

get_footer();