आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव ट्रकच्या धडकेत मोपेडस्वाराचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 6, 2022
Spread the love

कोंढवा पोलिसांत फिर्याद : पिसोळीतील धर्मावत पेट्रोलपंपासमोर झाला अपघात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव ट्रकची मोपेडला पाठीमागून धडक बसल्याने मोपेडस्वाराचा मृत्यू झाला. पिसोळी (ता. हवेली) येथे धर्मावत पेट्रोल पंपासमोर ३ मार्च २०२२ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. कोंढवा पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे.

सुभान जफिरा शेख (वय २३, रा. उमरीकला, ता.जि. मुरादाबाद, उत्तरप्रदेश) अपघातात मृत्यू झालेल्या मोपेड चालकाचे नाव आहे.

मुकतार आमीन शेख (वय ३५, रा. गट नं.८६, पी कासमबरी दर्गा, करीम मस्जिद औरंगाबाद) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी बलाल शेख (वय २३, रा. कोंढवा खुर्द, पुणे) यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पिसोळी येथून सुभान जफिरा शेख मोपेडवर जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकची त्यांना धडक बसून अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कोंढवा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील पुढील तपास करीत आहेत.

get_footer();